Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie | महाराजांच्या हस्ते ‘चौक’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च ! श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली ‘चौक’च्या कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप!

सातारा : Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie | ‘चौक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे कारण, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च (Chowk Poster Launch) करण्यात आले. साताऱ्यात (Satara) त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘चौक’च्या सर्व कलाकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. (Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie)

‘चौक’च्या सर्व कलाकारांनी, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ‘चौक’चे लेखक दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड (Devendra Arun Gaikwad) यांनी छत्रपतींना टीझर, ट्रेलर व चित्रपटाचे पोस्टर दाखवले, हे पाहून छत्रपती उदयनराजे प्रभावित झाले. त्यांच्या शुभहस्ते ‘चौक’चे मुख्य पोस्टर लॉन्च करण्यात आले. चित्रपटाचा आशय, विषय, कथा या सर्व गोष्टी छत्रपतींनी जाणून घेतल्या. चित्रपटाचा विषय त्यांना आवडला. चित्रपटासाठी एक उत्तम सामाजिक विषय निवडल्याने देवेंद्र गायकवाड यांचे त्यांनी कौतुक केले. ‘चौक’ चित्रपटातील किरण गायकवाड (Kiran Gaikwad), संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude), अक्षय टंकसाळे (Akshay Tanksale) आणि देवेंद्र गायकवाड यावेळी उपस्थित होते. तर, पंकज चव्हाण (Pankaj Chavan) हे ही यावेळी उपस्थित होते. छत्रपतींनी चित्रपटाच्या सर्व टीमला आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. (Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie)

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या (Anuradha Production) दिलीप लालासाहेब पाटील (तात्या)
Dilip Lalasaheb Patil यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत.
तर, चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद (Deool Band),
मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern), बबन (Baban Film), रेगे (Rege Film), धर्मवीर (Dharmaveer),
सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao), हिंदीतील तान्हाजी (Tanhaji) या चित्रपटांमध्ये
परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक
उत्सुक आहेत. हा चित्रपट १९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.

Advt.

Web Title :-   Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie | ‘Chowk’ movie poster launched by Udayanraje Maharaj! Chhatrapati Udayanraje Bhosale gave a pat on the back of the artists of ‘Chowk’!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दुर्देवी : शेततळयात बुडून बापलेकाचा मृत्यु, मदत मिळाल्याने आई वाचली

Deepak Kesarkar | विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर