उदयनराजेंचा शिवसेना-राष्ट्रवादीवर ‘हल्लाबोल’, पत्रकार परिषदेतील 10 ठळक मुद्दे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करण्यात आली. यानंतर देशात आणि महाराष्ट्रात वादंग उठले. भाजपवर चौफेर टीका करण्यात आली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज कुठे आहेत ? असा प्रश्न करत भाजपमधून राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी केली. त्या टीकेचा माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

शिवाजी महाराजांची किती मानहानी करणार ? शिवस्मारकाचे मागेच काम व्हायला पाहिजे होते. स्वार्थाने एकत्र आलेले लोक फारकाळ एकत्र राहु शकत नाहीत. स्वार्थ साधला की निघून जातात. राज्यातील जनतेने विचार करावा. जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात तेव्हा समान उद्दिष्ट असतं. शिवाजी महाराजांच्या नावाने दंगली झाल्या. श्रीकृष्ण आयोग बघा, लोकांचे जीव गेले. शिवसेनेनं नावातून शिव काढू टाकावं, मग कळेल किती तरुण तुमच्या पाठीमागे उभे आहेत, असे म्हणत उदयनराजे यांची शिवसेनेवर घाणाघाती टीका.

उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील ठळक 10 मुद्दे
1. कुणालाही ‘जाणता राजा’ची उमपा देणं याचा निषेध
2. जाणता राजा फक्त शिवाजी महाराज
3. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरूष
4. जेम्स लेनच्यावेळी शिवसेना कुठं गेली होती ? शिवसेनेला रोखठोक सवाल
5. हे पक्ष केवळ राजकारण करत आहेत. शेतकरी मरत आहेत. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पळवापळवी सुरु होती. राज्याचा खेळ खंडोबा केला.
6. शिवसेना भवनावरील चित्र बघा… शिवाजी महाराज कुठं आहेत ? वरती कोण… खाली कोण…
7. पुस्तकातील मजकुराबद्दल वाईट वाटलं
8. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का ?
9. महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं ? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का ? उदयनराजेंची शिवसेनेवर टीका.
10. माझा राजीनामा मागण्याऐवजी जे सरकारमध्ये आहेत त्यांचा घ्या… राज्य, देश सुखी होईल.

फेसबुक पेज लाईक करा –