Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Udayanraje Bhosale | विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडाळीमुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. हे पाहता आता राज्यातील अडीच वर्षाचं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घडामोडींवर आता भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच,” असं उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असं काही वाटत नाही. दोन वर्षापासून खदखद सुरु आहे. ज्यावेळी वेगवेगळे लोक एका ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र येतात तेव्हा त्यांना कुठलं आमिष दाखवण्याची गरज नसते. पण सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या आयडॉलॉजीचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना सत्तेसाठी तारेवरची कसरत करावी लागते. ही लोक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. त्यामुळेच ही परिस्थिती आहे. कारण यांची विचारधारा वेगवेगळी आहे. ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी त्यांनी विचार करायला हवा होता, टिकलो तर किती टिकणार ?,” असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, “लोक आज बोलून दाखवत आहेत की पक्षश्रेष्ठींकडून वेळ दिला जात नाही, कामं होत नाहीत. असं होत असताना 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत आमदार-खासदारकीची पाच वर्ष टर्म असते, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या टर्म संपत आहेत. सर्वांना निवडणुकीला सामोरे जावं लागत आहे. अशावेळी आपण विचार केला तर शिवसेना आणि भाजपच्या मतदारसंघात विरोधक कोण आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी. त्यामुळे ही समीकरणं जुळणार नव्हतीच,” असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | maha vikas aghadi government would not last long says udayanraje bhosale maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा