राष्ट्रवादीला आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का ! खा.छत्रपती उदयनराजे भाजपच्या वाटेवर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला तर राष्ट्रवादीला हा सगळ्यात मोठा धक्का बसणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे या भावांमध्ये असलेले राजकीय वैर सर्वश्रृत आहे. या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मात्र, त्यांच्यात समेट झाले नाही. अखेर शिवेंद्रराजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक राजे भाजपच्या वाटेवर आहेत. फलटचे रामराजे निंबाळकर हे देखील भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रीतील पुर परिस्थिती बाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितेल. तसेच आज चार वाजता शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले. यावेळी उदयनराजे भोसले शरद पवारांसोबत हजर होते.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like