Udayanraje Bhosale | ‘तर मिशीच काय… भुवया पण काढून टाकेन आणि…’, उदयनराजेंचे चॅलेंज शिवेंद्रराजे स्वीकारणार का? (व्हिडिओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे (Shivendraraj Bhosale) पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे पहायला मिळालं. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. शिवेंद्रराजे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना चांगलाच समाचार घेतला. एवढंच नाही तर तुम्ही, वार, वेळ ठरवून समोरासमोर या. आम्ही भ्रष्टाचार (Corruption) कुठे अन् काय केला तो सांगा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) भ्रष्टाचार केलाय, तर मी देवाची शप्पथ घेऊन सांगतो, मिशाच (Moustache) काय भुवया (Eyebrows) देखील काढून टाकेन, आणि परत तोंड दाखवणार नाही. अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना चॅलेंज दिले आहे.

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एकदा समोरासमोर येऊन भ्रष्टाचार कुठे केला याचा पुरावा द्यावा. लोकांसमोर अथवा गांधी मैदानात (Gandhi Maidan) मी येण्यास तयार आहे. माझा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर मी माझ्या मिशा आणि भुवया काढून टाकेन, असं आव्हान त्यांनी शिवेंद्रराजेंना दिले. तुमचं कार्य एवढंच मोठं होतं तर तुमच्या घरातली व्यक्ती सामान्य माणसाच्या विरोधात का निवडून येऊ शकली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

लोकांच हित हाच माझा स्वार्थ

लोकांची सेवा करण्याचा जो वसा आम्हाला मिळाला आहे तो आम्ही जपत आहे.
उलट तुमच्याकडून घराण्याला अशोभनीय कार्य घडत आहे. तुम्हाला जनमत अजमावयचं आहे तर सातारा
काय महाराष्ट्रत चला. यांना लोकांसाठी झिजनं काय असतं, हे माहीत आहे का? तुम्ही जर महान कार्य केलं
तर निवडणुकीत सर्वसामान्य माणसापुढे का टिकू शकला नाही. लोकांचं हित हाच माझा स्वार्थ आहे.
दुसऱ्याला कमी लेखून माणूस कधी मोठा होत नसतो, तो स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा होत असतो,
असा टोला उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांना लगावला. आता उदयनराजे यांना शिवेंद्रराजे काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.

Web Title :- Udayanraje Bhosale | mp udayanarajes criticism of shivendraraje

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna Crime News | जमिनीच्या वादातून आरोपीकडून सावत्र भावाची हत्या; जालन्यामधील घटना

Pradeep Sarkar Pass Away | दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे अल्पशा आजाराने निधन