Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना पदावरून काढण्यासाठी पक्षाला पत्र दिले होते. तरी देखील काहीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. युगपुरूषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी कायदे केले पाहिजेत. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर होतो आहे. त्यांच्यावर कोणीही आक्षेपार्ह बोलत असेल, तर कोणाला राग येत नाही. महाराजांची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन केली जात आहे. त्यामुळे ती जर का सुधारली नाही, तर पुढच्या पिढ्यांना महाराज तसेच होते, असे वाटेल. युगपुरूषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी कायदे केले पाहिजेत. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशात सध्या सुरु असलेले विकृतीकरण थांबविले पाहिजे. शिवाजी महाराज यांच्यावर वेडे वाकडे बोलणे सहन झाले नाही पाहिजे. राजकीय नेत्यांनी अशा लोकांच्या विरोधात कडक भूमिका घेतल्या पाहिजेत. जर ते शांत बसत असतील, तर त्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही, असे यावेळी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले.

उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत बोलताना अचानक भावूक झाले. शिवाजी महाराजांची प्रतिमा मलीन होत असल्याचे पाहून मनाला यातना होत आहेत. जर शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्यांचा इतिहास मलीन होत असेल, आणि ती करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर विमानतळांना आणि रस्त्यांना त्यांची नावे का द्यावीत? शिवाजी महाराजांची जयंती तरी का साजरी करायची? असे प्रश्न यावेळी उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केले.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | mp udayanraje bhosale become aggressive over governor bhagat singh koshyari statement regarding chhatrapati shivaji maharaj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या घरात ‘या’ कलाकारांनी घेतली वाईल्ड कार्ड एन्ट्री

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल