Udayanraje Bhosale | पक्ष बिक्ष नंतर बघू, मी शिवाजी महाराज यांचा वंशज म्हणून बोलतोय; उदयनराजे आक्रमक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी राज्यपाल आणि त्रिवेदी यांना धारेवर धरत राज्यापालांना हटविण्याची मागणी केली आहे. परंतु भाजप मात्र राज्यपालांना पाठिशी घालत आहे. भाजपमध्ये विरोधाभास पहायला मिळत आहे. एकीकडे फडणवीस राज्यपालांच्या विधानावर सारवासारव करत आहेत, तर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदींना हटविण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. तसेच मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले.

उदयनराजे भोसले म्हणाले, मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले ते सर्वांना माहीत आहे. कोणताही पक्ष असला तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची हकालपट्टी करावी, अशी माझी भूमिका आहे. माझ्या या भूमिकेत बदल होणार नाही. या प्रकरणावर सर्व नेत्यांना एका मंचावर बोलवून, प्रत्येक पक्षाने कोश्यारी, त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यांवर आपली भूमिका स्पष्ट करावी. मी भाजपचा खासदार आहे. पण दुसरीकडे मी शिवाजी महाराजांचा वंशज देखील आहे आणि ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे पक्ष बिक्ष नंतर बघुया.

तसेच माझा पक्ष कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कारवाई करेल. मी माझ्या पक्षावर विश्वास ठेवतो.
मी या मुद्यावर कोणाशीही तडजोड करणार नाही. त्यामुळे आता राज्यपालांवर भाजप पक्षश्रेष्ठी कारवाई करणार का,
याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | mp udayanraje bhosale comment on devendra fadnavis and bjp support ot bhagatsingh koshyari and sudhanshu trivedi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | शरद पवार बोलल्यावर उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते – देवेंद्र फडणवीस

Prakash Ambedkar | राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’