मायला.. ह्यांच्याकडं बघूनच घेतो…! ; उदयनराजे इन निळू फुले स्टाईल 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मावळ लोकसभा  मतदार संघात पार्थ यांच्या प्रचारार्थ सभा आयॊजीत करण्यात आली  होती. या सभेला राष्ट्रवादीचे  सातारा मतदार संघाचे उमेदवार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित होते. उदयनराजे यांची अनोखी स्टाईल खूप प्रसिद्ध आहे. या सभेदरम्यान देखील त्यांची वेगळी स्टाईल पाहायला मिळाली. यावेळी  बोलताना उदयनराजे भोसले यांनी मोदी सरकारवर  निळू फुले स्टाईल टीका केली.

यावेळी  मोदी सरकारवर टीका करताना उदयनराजे भोसले म्हणाले ” निळू फुलेंच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्याय मी, ह्याच्या मायाला ह्यांच्या… बघूनच घेतो “. पण, मी कधी बघून घेऊ शकतो, ज्यावेळी तुमच्या सर्वांची साथ असेल तर, असे म्हणत उदयनराजे यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये मोदी सरकारवर टीका केली. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये मात्र एकच हशा पिकला. या सभेदरम्यान पाऊस चालूं होता तरी देखील या सभेला नागरिकांनी गर्दी केली होती.

सरकारने केसाने तुमचा गळा कापला
यावेळी पुढे बोलताना भोसले म्हणाले, ” मोदी सरकारने सामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. तुम्ही मोठ्या अपेक्षेने देश मोदींच्या हातात दिला. रोजगार मिळतील, १५ लाख मिळतील, नोकऱ्या मिळतील, असा विश्वास तुम्हाला होता. पण, सरकारने केसाने तुमचा गळा कापल्याची टीकी उदनयराजेंनी केली. मात्र, मी हे करुन दाखवतो. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो. हो हे शक्य आहे, असेही भोसलेंनी म्हटले.

Loading...
You might also like