लक्षात ठेवा माझा ‘बँड’ मीच वाजवू शकतो : उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – विरोधी पक्षाचा खासदार असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम मला मदत केली. अनेक प्रकल्प मार्गी लावले. फडणवीस यांना जे जमलं ते साताऱ्याच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही असे सांगत उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निषाणा शाधला. 15 वर्षे मी राष्ट्रवादीमध्ये होतो. सत्तेत असूनही माझी कामं झाली नाहीत. काही लोकांनी माझा बँड वाजवायचा प्रयत्न केला. मात्र लक्षात ठेवा की माझा बँड मीच वाजवू शकतो, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सातारा येथे पोहचली होती. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी जाहीर सभेत आपले मनोगत व्यक्त केले. शनिवारी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर उदयनराजे भोसले हे आज महाजनादेश यात्रेत सहभागी झाले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच भाजपच्या व्यासपीठावर हजर राहून भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी अनेक गोष्टींवर खुलासा केला.

त्या पक्षाची अवस्था तुकड्यातुकड्यासारखी
आपल्या भाषणामध्ये उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली, मी तुकड्यावर जगतो, असं कोणी म्हणू नये. उलट अस म्हणणाऱ्यांनी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था तुकड्यातुकड्यासारखी का झाली याचा विचार करावा. पक्षाच्या अवस्थेबद्दल आत्मचिंतन केले असते, तर आत्मक्लेष करण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी लगावला.

आडवा जीरवा राजकारणाला कंटाळलो
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याला आडवा आणि त्याची जीरवा असे आहे. त्यांच्या या योजनेेला कंटाळून निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार उदयनराजे यांनी यावेळी केला. लोकांना आपण सतत फसवू शकत नाही असे सांगत पक्षाने आत्मपरिक्षण केले असते तर आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसती असा टोला पक्षावर आणि नेत्यांना लगावला.

You might also like