‘रडीचा डाव मी खेळत नाही’ : उदयनराजे भोसले (व्हिडिओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणूकीचे निकाल लागत असतानाच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपात गेलेले उदयनराजेंचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील तब्बल 87 हजार मतांनी विजय झाली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना उदयनराजेंनी रडीचा डाव मी खेळत नसल्याचं म्हंटलं आहे.

रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटील साहेब जिंकले हे खर आहे पण लोकसेवा काय केली हे जनतेने पाहिले पाहिजे. आगामी काळात देखील आपण कार्यरत राहणार असून अजिबात खचणार नाही असे उदयनराजेंनी सांगितले आहे. दरम्यान, पराभवानंतर प्रतिक्रिया देताना उदयनराजेंचा आक्रमकपणा पुर्वीसारखा दिसला नाही. त्यामुळेच की काय झालेला पराभव हा उदयनराजेंच्या जिव्हारी लागला आहे अशी चर्चा सद्या सुरू आहे.

सोशल मिडीयावर शरद पवारांच्या पावसातील सभेचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्या सभेनंतरच सातार्‍यातील वातावरण बदलले आणि उदयनराजेंचा पराभव झाला अशी देखील चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये आहे. उदयनराजे यांनी लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुक लढवली होती. त्यावेळी ते मोठया मताधिक्क्यानं आले होते. मात्र, चारच महिन्यात त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवुन भाजपात प्रवेश केला आणि पुन्हा निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

Visit : policenama.com