Udayanraje Bhosale | रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा : उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रयत शिक्षण संस्थेवरून राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे. राजघराण्यानं रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. पण ज्यांचे काहीही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतले जाते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे (Rayat Shikshan Sanstha) नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा, असा टोला उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी शरद पवारांना लगावला आहे.

उदयनराजे (Udayanraje Bhosale) पुढे म्हणाले कि, राजमाता सुमित्राराजे भोसले (Sumitraraje Bhosale) यांनी रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. अण्णा (कर्मवीर भाऊराव पाटील) आणि आज्जी (सुमित्राराजे) हे नेहमी समाजसेवेसाठी कार्यरत होते. आज या संस्थेचा पुर्वीचा हेतू राहिला नाही. रयतमध्ये राजकारण येऊ नये, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध असावेत असे संस्थेचे मत होते.

यानंतर अचानक बदल झाला आणि ‘हे’ त्यात आले. ज्यांचे योगदान नाही त्यांना तुम्ही घेताय.
रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था आहे. रयतचं नाव बदलून टाका.
ज्या कुटुंबाची संख्या जास्त आहे त्यांचे नाव द्या. या संस्थेमध्ये पवार कुटुंबियांची संख्या जास्त आहे.
त्यामुळे रयतचे नाव पवार शिक्षण संस्था करा, असा टोला उदयनराजेंनी यावेळी लगावला.

Web Title :- Udayanraje Bhosale | satara change the name of ryat education institute to pawar education institute mp udayanraje bhosale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Womens Asia Cup | टीम इंडियाने मलेशियाविरुद्धच्या सामन्यात आशिया कपमध्ये केला ‘हा’ नवा रेकॉर्ड

Dasara Melava 2022 | पुण्यात युवासेनेने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ; मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात, काळ…