Satara News : खासदार उदयनराजे समर्थक आक्रमक; महापुरूषाच्या नावाचा फलक फाडल्याचे प्रकरण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा (Satara) येथील ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) उदघाटन शुक्रवारी (ता.८) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. तेव्हा छत्रपती संभाजीराजे भोसले ( Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) भुयारी मार्ग असा नावाचा फलक लावला होता. या ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या महापुरषांचा नावाचा फलक रात्री अनाेळखी व्यक्तींना फाडला. ही बाब निदर्शनास येताच उदयनराजे समर्थकांनी आज (शनिवारी) घटनास्थळी पोहचून निषेध नाेंदविला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे भोसले भुयारी मार्ग असा नावाचा फलक लावला होता. तो फलक शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे आज (शनिवार) काही नागरिकांच्या लक्षात आले. त्याची माहिती उदयनराजे समर्थकांना देखील मिळाली. या प्रकाराचा समाज माध्यमातून तीव्र निषेध नाेंदविण्यास प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता उदयनराजे समर्थकांनी पाेवई नाका येथे जमण्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे शिवभक्त देखील मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले. यावेळी उदयनराजे समर्थकांनी प्रकाराचा निषेध नाेंदविला. यावेळी घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधित फलक त्यांच्या ताब्यात घेतला. दरम्यान संबंधितांना शाेधून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पाेलिस विभागास उदयनराजे समर्थकांनी केली आहे.