भाजपसोबत माझे चांगले संबंध, जनतेचे हित पाहून लवकरच निर्णय घेणार : उदयनराजे भोसले

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात आमदार आणि नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यासाठी धडपड करत आहेत. याआधी देखील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून आता राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

त्यावर खुद्द उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट करत या निर्णयावर स्वल्पविराम लावला आहे. पत्रकारांनी त्यांना भाजप प्रवेशाविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी “लोकांचे हित पाहून निर्णय घेईन” असे म्हटले आहे. त्यामुळे आता उदयनराजे नक्की काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा हि विकासकामांसंबंधी होती असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात साताऱ्याच्या विकासकामांत मदत केल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक पक्षात माझे संबंध चांगले असल्याने मी कोणत्याही पक्षात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, मी माझा निर्णय घेण्यास सक्षम असून जनतेच्या हिताचा निर्णय घेऊन मी लवकरच निर्णय घेईल असेदेखील ते यावेळी म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like