भाजप प्रवेशाबाबत खा. उदयनराजे म्हणतात…

 पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती मात्र उदयनराजे यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट विधान केले नव्हेते. रविवारी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी याबाबत संवाद साधला यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना उदयन राजे यांनी सत्ताधारी भाजपबाबत अनेक गोष्टींवर भाष्य केले.

नेमकं काय म्हणले उदयनराजे यावेळी –
अनेक दिवसांपासून भाजपचे लोक पक्षप्रवेशासाठी मागे लागलेले आहेत.
मात्र भाजपाच्या एकंदरीत कामामुळे सर्वसामान्य लोक त्रासले आहेत.
तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी टिकलो.
मागील काळात आडवा पाणी जिरवा असे राजकारण झाले.

तसेच भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांमध्ये घेऊ असेही उदयनराजेंनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलची स्पष्ट नाराजी उदयनराजेंनी यावेळी बोलून दाखवली ते म्हणाले ज्यावेळी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी पक्षातील एकही नेता बोलला नाही. बदल झाला पाहिजे असे म्हणत उदयनराजेंनी आपली स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली.

लोकसभेत मला यावेळेस कमी मताधिक्य मिळाले तसा हा पराभवाचं त्यामुळे सर्वांनी आत्मपरीक्षण करावे आणि निर्णय घ्यायला हवा’ असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं. कार्यकर्त्यांनी त्यांना नरमाईने घेण्यास सांगितले आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो मेनी असल्याचे सांगितले. उदयनराजेंनी सुद्धा येत्या २ दिवसात निर्णय घेऊ असे कार्यकर्त्यांना अश्वस्थ केले.

आरोग्यविषयक वृत्त –