‘मी जातोय, मला संपर्क करू नका’, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार्‍या उदयनराजेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे खासदार असलेले उदयनराजे भोसले हे उद्या नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याबद्दलची माहिती उदयनराजे यांनी ट्विट केले. राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे अनेक प्रयत्न करण्यात आले. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू राजेंनी मुंडेंना स्पष्ट नकार देत सांगितले की मी जातोय, माझ्याशी संपर्क करु नका.

धनंजय मुंडे यांनी सांगितले की, मी उदयनराजे यांना संपर्क करण्याचे खूप प्रयत्न केला. त्यांनी आमच्या एका मित्राकडे मेसेज पाठवला की, मला संपर्क करू नका, मी जातोय अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. उदयनराजे माझे कॉलेजमध्ये सिनियर होते, तेव्हापासून आमची मैत्री. काल शरद पवारांसोबत बैठक झाली. विधानसभेच्या प्रचाराबाबत चर्चा झाली. महाराजांनी भाजप सरकारच्या कामावर टीका केली. त्यानंतर मी कामाला लागलो. संध्याकाळी अचानक काय झाले कळले नाही.

पवार साहेबांना अशा काळात महाराज सोडून गेले, याचं वाईट वाटत असल्याची खंत मुंडेंनी व्यक्त केली. राजे गेले, सेनापती गेले, परंतू आमच्या सारखे मावळे अजून आहेत, आम्ही लढू असा विश्वास ही मुंडेंनी व्यक्त केला. 

You might also like