Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले

सातारा : वृत्तसंस्था – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर त्यांनी केलेल्या शिवाजी महाराजांवरील टिप्पणीवरून भाजपेतर पक्ष टीका करत आहेत. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र त्यांना पाठीशी घालत आहेत. पण, भाजपमधील एकमेव नेते खासदार उदयनराजे भोसले
( Udayanraje Bhosale) त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे भाजपची मोठी अडचण होत आहे. उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांनी राज्यपाल आणि त्रिवेदी यांना पदांवरून हटवा, अशी मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना, मी शांत बसणार नाही. माझ्यावर पक्षीय कारवाई झाल्यासदेखील मी घाबरत नाही. मी कारवाईला समोरा जाणार आहे. राज्यपालांनी मोठी घोडचूक केली आहे. त्यामुळे त्यांचे जो समर्थन करत असेल, त्याने कोश्यारींचे नाव घ्यावे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये. 3 डिसेंबरनंतर आम्ही राज्यपालांच्या विरोधातील आंदोलन तीव्र करणार आहोत. प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई झाली पाहिजे. मला खात्री आहे की, राज्यपालांवर कारवाई होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागून विषय सुटणार नाही. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा. माझ्यावर कारवाई करणारा जन्माला यायचा आहे. मी पक्षीय कारवाईला घाबरत नाही, असे यावेळी उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात शिवाजी महाराजांवर
आक्षेपार्ह भाष्य केले होते. शिवाजी महाराज आता जुने झाले आहेत. त्यामुळे ते आता जुने नायक आहेत.
तुम्हाला आता नवीन नायक महाराष्ट्रात मिळतील. त्यात नितीन गडकरींपासून शरद पवार यांच्यापर्यंत मोठे
नेते आहेत, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
भाजपेतर पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा इशारा केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे.

Web Title :- Udayanraje Bhosale | udayanarajes criticism of governor and mangalprabhat lodha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! बालविवाहप्रकरणी पतीवर FIR; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

Abhijeet Sawant | मराठी संस्कृतीबद्दल अभिजीत सावंतचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाला…..

Sharad Kelkar | शरद केळकरने आदिपुरुषमधील प्रभासच्या व्यक्तिरेखेला आपला आवाज देण्याबाबत केला खुलासा