Udayanraje Bhosale | आता नगरपालिका निवडणुकीत उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंना एकाचवेळी परभूत करण्याची राष्ट्रवादीची ‘रणनिती’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रावादी काँग्रेस (NCP) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव स्विकारावा लागला होता. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील (श्रीनिवास पाटील) यांनी उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांचा पराभव केला होता. या पराभवाची सल अद्याप उदयनराजे यांच्या मनात आहे. दरम्यान, सातारामधील आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये (Satara Municipal Election) उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन भाजपच्या (BJP) राजेंना एकाचवेळी पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने रणनिती (strategy) आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार (Deepak Pawar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा केली असून पवार यांनी सकारात्मक संकेत दिल्याची चर्चा आहे.

येत्या काही महिन्यामध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल (NCP panel) उभे करण्याचा प्रस्ताव शरद पवार यांच्यासोर मांडण्यात आला. शरद पवार यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक संकेत दिले. तुमच्या प्रस्तावाबाबत अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी सांगितल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी कधीही पक्षाचा पॅनल उभा केला नव्हता.
परंतु यावेळी शिवसेना (Shivsena) व काँग्रेसला (Congress) सोबत घेऊन दोन्ही राजेंना साताऱ्यात आव्हान द्यावे.
तसे केले तर उदयनराजे (Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे (Shivendra Raje) यांना आपण पराभूत करु शकतो,
असा विश्वास दीपक पवार यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे दोन्ही राजेंमध्ये तितकेसे सख्य नाही. विविध कारणांवरुन त्यांच्यामध्ये खटके उडत आहेत.
त्यामुळे आगामी निवडणुकीत ते एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
त्यामुळे एकाचवेळी दोन्ही राजेंना पराभूत करता येऊ शकते. त्यांच्यातील मतभेदाचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो.

Web Title :- Udayanraje Bhosale | udayanraje bhosale defeated lok sabha now ncp will make strategy defeat both rajes same time satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rains | राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! आजपासून 3 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 6 राज्यांमध्ये होणार जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Earn Money | 1 रुपयाची ही नोट तुम्हाला मिळवून देऊ शकते 45,000 रुपयांपर्यंत मोठी कमाई, जाणून घ्या कशी?

Pune Court | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात 13 पुरावे न्यायालयात सादर; आरोपींच्या वकिलांनी केली ‘ही’ मागणी