Udayanraje Bhosale | आत्मचिंतन केलं असतं तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती; उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येकालाच सत्ता हवी असते, आपण सत्तेत रहावे. पण सत्ता गेल्यावर ती का गेली याचे आत्मपरीक्षण करावे. ते केले असते तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा खोचक टोला उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. शिवसेना (Shivsena) माझी आहे, असं मी म्हणू का ? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील असं दिसतंय असेही उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले.

 

शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची ? असा प्रश्न विचारला असता उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अख्खा महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का ? शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) हे राजे होते. इथे जाणता राजा देखील एकच आहे, शिवाजी महाराज, असे वक्तव्य त्यांनी केले. राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळांचा (Tourist Destination) विकास व्हावा यासाठी मी दीपक केसरकरांची (Deepak Kesarkar) भेट घेतली आहे, असा खुलासा उदयनराजेंनी केला.

 

मराठा आरक्षणासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले

देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मराठा नसूनही समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले.
याउलट पाटील, महाडिक, शिर्के, भोसले अशा आडनावाच्या फक्त पाट्या लावणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले असा सवाल उदयनराजेंनी केला.
ज्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला त्या फडणवीसांना जातीयवादी म्हणता.
मी जातपात बघत नाही. शिवाजी महाराजांनी जातपात पाहिली नाही, मग मी कसा पाहीन, असेही ते म्हणाले.
सगळ्यांची लायकी असते, असे कसे पंकजा मुंडे (Pankaja Munde) बोलल्या ते माहिती नाही,
अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावर दिली.

 

अशोकाचं झाड स्वत: वाढतं पण…

उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणविषयक (Maratha Reservation) उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
अशोकाचं झाड स्वत: वाढतं पण इतरांना सावली देत नाही.
गेल्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाची जबाबदारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे दिली असती तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता.
पण ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाची धुरा होती त्यांनी काहीच केले नाही, अशी टीका उदयनराजे यांनी केली.

 

 

Web Title : –  Udayanraje Bhosale | udayanraje meets deepak kesarkar shall i say shiv sena is mine all maharashtra is mine udayanrajs reaction on politics pankaja munde uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा