Udayanraje Bhosle | ‘कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा, मी आहेच’ – खासदार उदयनराजे भोसले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Udayanraje Bhosle | राज्याच्या राजकारणातच मोठा गोंधळ उडाला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर भाजपच्या (BJP) गोटात नेमकं काय चाललंय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. त्यावेळी ‘कुणाच्या धमक्यांना घाबरु नका. कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा मी आहेच,’ असा इशाराच उदयनराजेंनी विरोधकांना दिला आहे.

 

“राज्यातील सत्ता नाट्यात मी तुमच्या बरोबर आहे,” असं उदयनराजे (Udayanraje Bhosle) यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. दरम्यान शिवसेना रस्त्यावरच्या लढाईला तयार झाली असतानाच उदयनराजे भोसले यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. “राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम अभिनंदन माझ्याकडून,” असं म्हणत उदयनराजे यांनी फडणवीसांना शाल पांघरली, ‘मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही लढा,’ अशा शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आहे.

“हे गठबंधन अनैसर्गिक होते ते तुटणारच होते. सरकार पडले आहे. कुणी ही धमक्या देऊ नयेत.
ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे. धमक्यांना भीक घालणार नाही.
कुणाला धमक्या आल्या तर मला सांगा, मी आहेच,” असा इशाराचं उदयनराजेंनी दिला आहे.
भाजप व बंडखोर शिंदे गटाच्या बाजूने उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
हे पाहता उदयनराजेंनीही या घडामोडीत उडी घेतल्याचे दिसते.

 

Web Title :- Udayanraje Bhosle | ‘If anyone threatens me, tell me, I am’ – MP Udayan Raje Bhosale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा