…त्यापेक्षा मी मेलेलं बरं, उद्यनराजेंचा ‘त्या’ वक्तव्यावरून संतप्त खुलासा

सातारा (वाई) : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील गडकिल्ल्यांवर डान्सबार करण्याला परवानगी द्यायला हवी असे कोणतेही वक्तव्य मी केले नसताना त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. मी आजपर्यंत तत्व पाळली आहेत. असे विचार माझ्या मनात कसे येतील. त्यापेक्षा मेलेलं बर, अशी संतप्त प्रतिक्रीया भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. तसेच असे होणार असेल तर यापुढे कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही. तसेच कोणाशी न बोललेलच बरं असेही त्यांनी म्हटले आहे. वाई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गडकिल्ले ही छत्रपती शिवरायांची आठवण व पराक्रमाची प्रतीके आहेत. या गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे असे माझे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केले आहे. गड, किल्ल्याबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही, त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा काही जणांकडून प्रयत्न होत आहे. गडकिल्ले पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून, लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्यासाठी व्यवस्था असावी यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

गड किल्ल्यांवर निवासाची सोय, पायथ्याशी राहण्याची व्यवस्था असावी. गडावर जाण्यासाठी रोपवे असावा, अशी भूमिका मी मांडली होती. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. चुकीचे खापर माझ्या फुटणार असेल तर हे बरोबर नाही. ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होणार आहे. मी संकुचित बुद्धीचा नसून निवडणूक आली की माझ्या चारित्र्यहननाचा काही जणांकडून कट शिजवला जातो, असा आरोप उदयनराजे यांनी केला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी