home page top 1

जब तक है जान तब तक डॉल्बी वाजवणार, उदयनराजेंचा इशारा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

गणेशोत्सादरम्यान कोर्टाच्या आदेशानुसार डॉल्बीवर मर्याद घालण्यात आली आहे. कोल्हापूर, सातार परिसरात पोलिसांनी गणेशोत्सावाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी कारवाई करुन सात लाखांचे डॉल्बीसेट जप्त केले. यावरुन संतापलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉल्बीने प्रदूषण होते तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय ? विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टीव्हल डेसिबल दिसला नाही का असा सवाल त्यांनी केला आहे. उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच जब तक है जान तब तक डॉल्बी वाजणार’, असा इशारा सरकारला दिला होता. तसेच मंगळवार तळे माझ्या मालकीचे तिथे काय करायचे काय नाही ते मी ठरवणार कंटेंट ऑफ कोर्ट होऊच शकत नाही आणि झाला तर तो माझ्यावर होईल अशा इशाराही उदयनराजेंनी दिला.
[amazon_link asins=’B0734VLDTC,B0073C7IIK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca1e8239-b80e-11e8-8a5e-fb385e7d8540′]

डेसिबलची मर्यादा घालून डॉल्बीला मंजुरी द्यायला हवी. इथं तरुणांना रोजगार मिळत नाही. काही तरूणांनी कर्ज काढून डॅाल्बी सेट घेतले आहेत. आता त्यांच्यावर जप्ती आलीय याला जबाबदार कोण? त्या पोरांनी कर्ज कसं फेडायचं ?, असा सवाल राजेंनी उपस्थितीत केला.

मला अटक करायचे सोडून द्या, मी जनतेसाठी काहीही करू शकतो. डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय?, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का ? असा सवालच राजेंनी नांगरे पाटलांना विचारलाय. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा राजेंनी दिला. तसेच सातारा गणेश विसर्जन मंगळवार तळे येथेच होणार आहे. या बाबत कारण नसताना प्रसासनाने गोधळ घातला आहे. तळ्याच्या बाबतीत काहीही शंका बाळगू नका मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही खासदार उदयनराजेंची पुन्हा एकदा प्रशासनाला दिलाय.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.

Loading...
You might also like