शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर उदयनराजेंचा हात ; प्रात्यक्षिक देऊ का : शिवेंद्रराजेंचा टोला

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपतींचे दोन वंशज साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात असलेला वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. एका कार्यक्रमा दरम्यान दोघे एकमेकांसमोर आले असताना, नक्की काय होईल याची धाकधुक दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना लागली होती. मात्र दोघांमध्ये हस्तांदोलन झाले इतकेच नव्हे तर दोघांमध्ये शाब्दिक टोलेबाजीही झाली.

छत्रपतींच्या दोन वंशजांमधील वाद संपूर्ण महाराष्ट्र्राला माहित आहे. दोघेही एक मेकांवर सतत टोलेबाजी करत असतात. मात्र, काल साताऱ्यातील जावळी येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उदयनराजे गेले असता, तेथे त्यांची शिवेंद्रराजेंची भेट झाली. दरम्यान, दोघांमध्ये हस्तांदोलन झाले. याचबरोबर दोघांमध्ये जोरदार टोलेबाजीही झाली.

दरम्यान, खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंचा खांदा दाबला. त्यावेळी, तुम्ही माझा सारखा खांदा का दाबता ? असा सवाल शिवेंद्रराजेंनी विचारला असता, मी तुमची बॉडी चेक करत आहे. असे उत्तर उदयनराजेंनी दिले. दरम्यान उदयनराजेंच्या या उत्तराला तुम्हाला मी प्रात्यक्षिकही दाखवू शकतो असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला.

विशेष म्हणजे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेल्या धावत्या भेटी नंतर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच जोरदार चर्चा सुरु आहे.