…तर, मी नक्षलवाद्यांचे नेतृत्व करायला तयार : उदयनराजे

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन –  जर आपली मुले उपाशी असतील तर माणूस करणार काय तो दुसऱ्याच्या ताटातील हिसकावूनच घेणार. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या अशा लोकांना जर कोणी नक्षलवादाची उपमा देत असेल तर अशा लोकांचे नेतृत्व करायला मी कमी पडणार नाही, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. खटाव तालुक्यातील जनतेने दुष्काळी प्रश्नावरून वडूज तहसिलदारांना निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपचं कुत्रं तरी स्वातंत्र्याच्या लढाईत होतं का? : अशोक चव्हाण 

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून सातारा जिल्ह्यातील खटाव हा कायम दुष्काळी तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जनतेने काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील निवेदन उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना वडूज येथील तहसिलदार कार्यालयासमोर देण्यात आले. यावेळी आंदोलकांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, सरकारने यात बारकाईने लक्ष दिले नाही तर मोठ्या प्रमाणात नक्षलवादी तयारी होतील. पोलिस, प्रशासनाकडे गेल्यावर न्याय मिळत नसेल तर ते न्याय हक्कासाठी भांडणारच. संपुर्ण राज्यकर्ते व प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही नक्षलवादी होण्यासाठी लोकांना प्रवृत्त करु नका, एकदा जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर कोणीच थांबवू शकणार नाही.

हंगामपूर्वीच दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात हापूसचे आगमन
नवी मुंबई : हंगामापूर्वीच दिवाळीचा मुहूर्त साधत जगप्रसिद्ध हापूस आंब्याचे वाशीतील घाऊक फळबाजारात आगमन झाले आहे. प्रथमच दाखल झालेल्या या आंब्याचे व्यापाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. व्यापाऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने या पहिल्या हापूस आंब्यांची विधिवत पूजा केली. दापोलीमधील उदय नरवणकर या आंबा बागायतदाराकाडून नऊ डझन आंबे, तर देवगडवरून १२ डझन आंबे घाऊक बाजारातील व्यापारी प्रमोद पाटे यांच्याकडे आले आहेत.

बाळासाहेबांच्या नावाच्या विमा योजनेला भाजपने दाखवला कात्रजचा घाट 

पावसाळ्यात पडलेल्या थंडीमुळे आंब्याला मोहर येऊन फूट पडली होती. ती सांभाळून या आंबा बागायतदारांनी हे हापूस आंबे जोपासले होते. त्यांची व्यवस्थित निगा राखल्याने हे आंबे बाजारात पाठवता आले. यामुळे आंब्याचा हंगाम लवकर सुरू होईल, असे व्यापाऱ्यांना वाटते. कोकणात आता थंडी पडायला सुरुवात झाली आहे. आंब्याच्या झाडाला मोहोर येवू लागला आहे. हा मोहोर व्यवस्थित राहिल्यावर त्याला फूट धरून गोळे पकडले जातात आणि मग आंबा दिसू लागतो. आत्ता आलेल्या मोहोरातील आंबा फेब्रुवारी, मार्चमध्ये बाजारात यायला सुरुवात होईल आणि मग हापूसचा खरा हंगाम सुरू होईल, असे वाशी बाजारातील आंबा व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. हंगामाच्या आगोदर सर्वप्रथम येणाऱ्या हापूस आंब्याला दरही चांगला मिळतो. मुंबईतील उच्चभ्रू वर्गात हा आंबा डझनाला चार ते पाच हजारांच्या घरात विकला जात असल्यामुळे पहिल्या हापूस आंब्याची सर्वांना उत्सुकता असते.