मनोमिलनाच्या बैठकीनंतर उदयनराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा लोकसभा मतदार संघातील चर्चेचा विषय म्हणजे तेथील दोन राज्यांच्या मनोमिलनाची आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले. आता ही बैठक झाल्यानंतर उदनराजेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

‘एकदिलाने काम करण्यास सर्वांची अनुमती आहे. येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन जायला तयार आहे,’ असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मनोमिलनासाठी उदयनराजे तयार झाल्याचे दिसत आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेने दोन्ही राजांचे मनोमिलन झाल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

दरम्यान, सातारा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मतांतर आहेत. त्यामुळे पक्षातील हा अंतर्गत वाद लोकसभेत त्रासदायक नको म्हणून पक्षातील वाद मिटवण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. यापूर्वीही शरद पवार यांनी यासाठी प्रयत्न केले होते. पण त्यानंतर आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी आपण अजूनही उदयनराजेंवरची नाराजी स्पष्ट केली होती.

दरम्यान, शिवसेना-भाजपची युतू झाल्यानंतर भाजप सातारा मतदार संघावर दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे साताऱ्यातून भाजप नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे मनोमिलन झाले तर साताऱ्यातून लोकसभेला उदयनराजे विरूद्ध भाजपचे नरेंद्र पाटील असा सामना दिसेल.

ह्याहि बातम्या वाचा-

३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

युद्धासाठी आपण किती सज्ज !

प्रवीण गायकवाड यांना वंचित आघाडीनं पाठींबा द्यावा  कोळसे पाटलांनी घातले आंबेडकरांना साकडं    

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची शरद पवारांनी केली दिलजमाई