‘उध्दवा अजब तुझे सरकार’, देशद्रोही अस्लम आता देशभक्त झाले, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी सरकार स्थापनेच्या तब्बल ३४ दिवसानंतर सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांची या मंत्रिमंडळात वर्णी लागली. काँग्रेसमधील १० आमदारांनी घेतलेल्या शपथविधी मध्ये मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार अस्लम शेख यांचाही समावेश होता. मात्र, अस्लम शेख यांच्या शपथविधीवरुन भाजपने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’, असे म्हणत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

”काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ”उद्धवा अजब तुझे सरकार… देशद्रोही आता देशभक्त झाले आहेत. २०१५ च्या अधिवेशनावेळी सध्याचे मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी याकूब मेमनच्या मृत्युदंडाची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी ६ वेळा महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन स्थगित केलं होतं, अस्लम शेखला देशद्रोही असंही म्हटलं होतं. मात्र, आता तेच अस्लम शेख उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री बनले आहेत, असे म्हणत सोमैय्या यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी मुंबईतील १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यातील आरोपी दहशतवादी याकूब मेमनला फाशीची शिक्षा न देता माफी देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. यावेळी, शिवसेना आमदारांनी शेख त्यांच्या मागणीचा जोरदार विरोध करत त्यांना देशद्रोही असेही म्हटले होते. मात्र, त्याच अस्लम शेख यांचा आता उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यावरुन भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारवला लक्ष्य केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/