Uddhav Thackeray | “केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव…”; राऊतांच्या भेटी नंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल १०३ दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय अन्वेषण संस्थांविरुद्ध हल्ला चढविला. केंद्रीय संस्था या केंद्र सरकारच्या पाळीव असल्याने चुकीच्या घटना घडत असल्याचे म्हणत, सुपारी घेऊन काम करणाऱ्या संस्था का बंद होऊ नयेत असा प्रश्न ही ठाकरेंनी उपस्थित केला.

 

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात मित्रांच्या सोबत राहतो. संजय माझ्यासोबत लढत आला आहे. ज्यावेळी खोट्या केसमध्ये अडकवून संजयला जेलमध्ये टाकले, त्यावेळी आम्ही त्यांच्या प्रत्येक क्षणात कुटुंबासोबत होतो. संजयने जे काही कर्तृत्व केले आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे. काल जो न्यायालयाने निकाल दिला तो निर्णय आम्ही मान्य करतो.’

 

देशातल्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे त्याला न्यायदेवतेने चपराक दिली आहे.
संजय राऊतांवरचा आरोप खोटा आहे. परंतु खोट्या केसेसमध्ये संजय राऊत यांना पुन्हा अटक होऊ शकते.
तसेच शिवसेनेतून फुटून गेलेल्यांना ही चपराक आहे. शिवसेना लढायला शिकवते, रडायला नाही. हे यातून दिसून येते.’ असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray | sanjay raut meet uddhav thackeray after 103 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Ponkshe | ‘हर हर महादेव’च्या समर्थनात शरद पोंक्षे म्हणले, ‘तुम्ही गुंड आहात का? हा शुद्ध हलकटपणा…’

Chitra Wagh | ‘एखाद्या महिलेचा अपमान म्हणजे…; भाजपच्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू