Uddhav Thackeray | ‘…आणि ती घोषणा थेट काश्मिरात पोहचली;’ उद्धव ठाकरे यांनी सांगितला तो भन्नाट किस्सा…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – Uddhav Thackeray | आज (दि.२६) शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी (MP Rajan Salvi) यांनी आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीराची पाहणी करण्यासाठी ठाणे येथे आले असता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ५० खोक्यांची घोषणा थेट काश्मिरमध्ये पोहचल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांनी आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीराचे कौतुक केले. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलेलो आहे. काही दिवसांनी ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येईल. एका गोष्टीचे समाधान आहे. सध्या जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा राजकारणात आला आहे. तो दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. अन्यायावर लाथ मारा, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. त्याचसोबत शिवसेनाप्रमुखांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिकवले आहे. त्याप्रमाणे राजन साळवी हे समाजकारण करत आहेत, याचा आनंद वाटतो.’
यावेळी छोटेखानी सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, अस्सल शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. बाकी जे विकाऊ होते, ते विकले गेले. काय भावाने विकले गेले हे तुम्हाला माहितचं आहे.
असं उद्धव ठाकरे यांनी म्हणताच, उपस्थित शिवसैनिकांकडून ५० खोके च्या घोषणा सुरू झाल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमधील (Bharat Jodo Yatra) प्रसंग सांगितला. संजय राऊत (MP Sanjay Raut) भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मू आणि काश्मिर येथे गेले असता, त्यानंतर त्यांनी मला एक व्हिडीओ दाखवला. काश्मिरमध्ये देखील लोक ५० खोकेच्या घोषणा देत आहेत. म्हणजेच देशाच्या कानाकोपऱ्यात या घोषणा पोहचल्या आहेत.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ज्यांनी या आरोग्य शिबीरासाठी योगदान दिले त्यांचे आभार मानले.
तसेच त्यांनी मुख्यमंत्री असतानाची अडीच वर्ष कोरोनाचे जागतिक संकट होते. या आठवणींना देखील उजाळा दिला.
अनाकलनीय संकट आल्यानंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले पाहिजे.
अशा शब्दात त्यांनी कोरोनाकाळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
कोरोनाकाळात मंदिरं बंद होती. त्यावरून काही जणांनी माझ्यावर टीका केली.
मी त्यांना एकच उत्तर दिले, देव भेटतोय. तो डॉक्टर आणि नर्सेस यांच्या रूपाने आपले प्राण वाचवायला आला आहे.
पोलिसांनी देखील खूप मेहनत घेतली. आरोग्य फार महत्वाचा विषय आहे.
त्यामुळे खासदार राजन साळवी यांनी आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीराचे मी कौतुक करतो.
असं देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
Web Title :- Uddhav Thackeray | 50 khoke slogan reached at jammu and kashmir says shivsena leader uddhav thackeray in thane
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update