‘ठाकरे सरकार’मधील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटप, जाणून घ्या कोणाचा कितवा ‘मजला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नव्या मंत्र्यांच्या बंगले वाटपानंतर आता मंत्रालयातील दालनांचेही वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य इमारतीच्या 6 व्या मजल्यावर 601 क्रमांकाच्या दालनातून राज्याचा कारभार पाहणार आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील हे 6 व्या मजल्यावर असणार आहेत. त्यांनाही इथलंच दालन देण्यात आलं आहे. तसेच अन्य मंत्री कोणत्या मजल्यावरील कोणत्या दालनात बसून कारभार पाहतील याचीही उत्सुकता सर्वांमध्ये दिसत आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षांचं मिळून महाविकासआघाडीचं सराकर स्थापन झालं आहे. गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तीनही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाल्यानंतर आता दालनाचेही वाटप करण्यात आले आहे.

हे वाटप पुढीलप्रमाणे-
1)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- मंत्रालय मुख्य इमारत, 6 वा मजला, दालन क्र- 601

2) एकनाथ शिंदे- मंत्रालय विस्तारीत इमारत, 3 रा मजला, दालन क्र- 302 ते 307

3) सुभाष देसाई- मंत्रालय मुख्य इमारत, मध्य बाजू, 5 वा मजला, दालन क्र- 502

4) जयंत पाटील- मंत्रालय विस्तार इमारत, 6 वा मजला, दालन क्र- 607

5) छगन भुजबळ- मंत्रालय मुख्य इमारत, मध्य बाजू, 2रा मजला, दालन क्र-202

6) बाळासाहेब थोरात- मंत्रालय विस्तार इमारत, पहिला मजला, दालन क्र- 108

7) डॉ. नितीन राऊत- मंत्रालय मुख्य इमारत, मध्य बाजू, 4 वा मजला, दालन क्र- 402

महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सो. ना. बागुल यांनी राज्यापालांच्या नावाने हा बंगला वाटपाचा शासन निर्यण जाहीर केला आहे.

Visit : policenama.com