Uddhav Thackeray And Dilip Walse-Patil | राष्ट्रवादी शिवसेनेला गृहखातं देणार ?; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray And Dilip Walse-Patil | महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याचं गृहखातं हे राष्ट्रवादीचे (NCP) नेते दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे आहे आणि आता या खात्याची मागणी शिवसेनेने (Shivsena) केली असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील सरकारमधील नेत्यांवर कारवाई करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने राष्ट्रवादीकडे गृहखात्याची (Home Department) मागणी केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse-Patil) यांची भेट होणार आहे. (Uddhav Thackeray And Dilip Walse-Patil)

 

राज्यातील भाजप नेत्यांविरूद्ध अनेक पुरावे देऊनसुद्धा दिलीप वळसे पाटील कारवाई करत नाहीत. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असून भाजपला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवसेनेकडे गृहखातं घेण्यात यावं, असा मतप्रवाह शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहे. मात्र या चर्चा असल्या तरी शिवसेनेची ही मागणी राष्ट्रवादी मान्य करेल याबाबत शंका आहे. यासंदर्भातच उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे – पाटील यांच्यामध्ये याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातील (Maharashtra) गृहखात्याने कडक भूमिका घेण्याची गरज आहे.
कारण जर आपण आस्ते भूमिका घेत असाल तर गळ्याभोवती फास आवळला जात आहे.
आताच पाऊले उचलली नाहीत तर रोज एक खड्डा खणला जात आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, आता मुख्यमंंत्री आणि वळसे पाटलांच्या बैठकीनंतर पुढे काय होतं ?, याबाबत पुढील दिशा समजणार आहे.
त्यामुळे सर्वांच्या नजरा या बैठकीकडे आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray And Dilip Walse-Patil | cm uddhav thackeray not happy with dilip walse patil performance shivsena may demand home ministry from ncp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा