×
HomeशहरपुणेUddhav Thackeray and Sharad Pawar | 'महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद...

Uddhav Thackeray and Sharad Pawar | ‘महाराष्ट्र आत्मनिर्भर व्हावा ही मुख्यमंत्री, शरद पवारांची इच्छा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या Corona संकटात ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला होता. शरद पवारांनी आवाहन केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला. मात्र आता इतर राज्यांपुढे महाराष्ट्राला हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी आपलं राज्य आत्मनिर्भर व्हाव अशी इच्छा मुख्यमंत्री आणि शरद पवारांची Uddhav Thackeray and Sharad Pawar आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे Health Minister Rajesh Tope यांनी म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट Vasantdada Sugar Institute येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित आहेत. त्यापूर्वी राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

राजेश टोपे म्हणाले, आशा वर्कर यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. त्यासंदर्भात युनियनसोबत चर्चा झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट Corona Third Wave उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत जर ते आंदोलन करणार असतील तर ते चुकीचे आहे.

woman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय कायद्यात बदल होणे आवश्यक आहे.
त्यामुळे त्या तो बदल करावा आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत.
मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी महविकास आघाडीची अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील तीन कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
उर्वरित १३ कोटी लोकांचे लसीकरण बाकी आहे.
त्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करणे अपेक्षित आहे.
केंद्राने महाराष्ट्राला अधिकाधिक लस देणे आवश्यक आहे.
दरम्यान, सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि सातारा येथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त दर असून तेथील परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असेही त्यांनी म्हंटले.

Minister Eknath Shinde | मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, अभिनेत्याला अटक

कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसचे संकट ओढवले आहे.
म्युकरमायकोसीस वरील उपचारासाठी खर्च जादा आहे.
सर्वसामान्यांना हा खर्च न परवडणारा असल्याने राज्य सरकाराच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १३३ रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावरील रुग्णांवर उपचार मोफत केले जात आहेत.
त्या आजारासाठी एमफोटेरिसिन इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत.
या आजारावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांनी इंजेक्शनसाठी जादा पैसे घेऊ नये, अशी सूचना राजेश टोपेंनी यावेळी केली.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Uddhav Thackeray and Sharad Pawar rajesh tope ncp sharad pawar cm uddhav thackeray vaccination oxygen

हे देखील वाचा

Five Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News