Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! विधानसभा अध्यक्षांनी ‘ही’ मागणी फेटाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांन आणखी एक धक्का बसला आहे. विधिमंडळ कामकाज समितीमध्ये (Legislative Affairs Committee) ठाकरे गटातील एकाही आमदाराचा (MLA) समावेश करण्यात आला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्याकडून दादा भुसे (Dada Bhuse) आणि उदय सामंत (Uday Samant) यांची या समितीवर नेमणूक केली आहे. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी (Shiv Sena Group Leader Ajay Chaudhary) यांनी पत्र लिहून समितीच्या सदस्य पदासाठीच्या नियुक्तीचे पत्र द्यावं आणि समितीच्या बैठकीला आमंत्रित करावं, अशी मागणी करणारं पत्र प्रधान सचिवांकडे (Principal Secretary) दिलं होतं. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का दिला आहे.

 

विधिमंडळ कामकाज समितीतल्या सदस्य नियुक्तीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांच्यासह इतर पक्षांच्या गटनेत्यांना विधिमंडळ सचिव यांना पत्र पाठवलं आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाला (Thackeray Group) असं पत्र मिळालेलं नाही. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अजय चौधरी यांची गटनेतेपदी तर सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांची प्रतोदपदी नियुक्ती केली होती.

 

प्रत्येक अधिवेशनापूर्वी विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होते.
या बैठकीत विधिमंडळाच्या कामकाजाबाबत चर्चा केली जाते.
यंदाचं पावसाळी अधिवेशन (Rainy Season) 17 ऑगस्ट पासून सुरु होत आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन होणार आहे, त्यामुळे ते वादळी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | another set back to shivsena chief uddhav thackeray no mla in vidhimandal kamkaj samiti

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

 

RBI Action On Rupee Co-Operative Bank | रुपी बँकेचा RBI कडून परवाना रद्द

 

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू