माजी CM अब्दुल्ला यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘कौतुक’ !

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील स्थिती ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्याबद्दल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ठाकरे यांचे ट्वीटद्वारे कौतुक केले आहे. यापुर्वी अनेकांनी ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या अधिक असतानाही उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्थिती हाताळत आहेत त्याबद्दल अनेकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. दरदिवशी राज्यातील विविध शहरतील कोरोना बाधितांसंदर्भात माहिती घेउन कारवाईची सूचना केली जात आहे. विदयार्थी, नोकरदार, महिला, मुले, जेष्ठ नागरिकांसह अनेकांना ठाकरे यांच्याकडून दिलासा दिला जात आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक सूचनांचे पालन करण्यासाठी व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांच्याकडून नागरिकांना दिलासा देण्यात येत आहे. केंद आणि राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्यामुळे नागरिकांच्या मनात कोरानाबद्दल भीती कमी होत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.