छगन भुजबळांना पक्षात घेणार नाही : उद्धव ठाकरे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची घरवापसी होणार आणि ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशा बातम्या सुरु होत्या. मात्र भुजबळांनी कधीही या गोष्टीच समर्थन केलं नव्हतं ही केवळ मिडियामधील चर्चा असल्याचे त्यांनी म्हंटले होते.

आता मात्र छगन भुजबळ यांचे शिवसेनेतील प्रवेशाचे दरवाजे स्वतः उद्धव ठाकरे यांनी बंद केले आहेत. नाशिकमधील शिवसैनिकांचा भुजबळांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला होता अखेर वाढत्या विरोधानंतर भुजबळांसाठी शिवसेनेची दारे बंद झाल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः नाशिकच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे की, भुजबळांना पक्षात घेणार नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये नारायण राणे यांचे भाजपात तर भुजबळांचे शिवसेनेत पुनर्वसन होणार असल्याच्या जोरदार बातम्या येत होत्या मात्र भुजबळांच्या घरवापसीची दारे आता बंद होत असल्याचे दिसत आहे.
आरोग्यविषयक वृत्त –

You might also like