आपल्या कुटूंबावर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा ‘आरोप’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी ठाकरे घरातील व्यक्तीवर आणि ठाकरे कुटूंबावर पहिल्यांदा खोडारडे पणाचा आरोप लावण्यात आला असे ते म्हणाले.

यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्यावर खोटारडे आरोप लावण्यात आले. परंतू खोटे बोलायला मी भाजप नाही. ठाकरे घरातील व्यक्तीवर आणि ठाकरे कुटूंबावर पहिल्यांदा खोडारडेपणाचा आरोप लावण्यात आला.

अमित शाह आणि कंपनीने किती खोटे बोलले हे जनतेला माहित आहे. जनतेनी पाहिले आहे की कोण किती खोटे बोलतो. भाजपला आपण शत्रू मानत नाही परंतू खोटं बोलू नये. ठरलं नव्हतं असं म्हणू नये कारणं तो माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे म्हणत भाजपवर पलटवार केला.

ते म्हणाले होते की उपमुख्यमंत्री पद देतो परंतू उपमुख्यमंत्रिपदासाठी मी युती केली नसती. असे असेल तर फडणवीस, अमित शाह यांच्या मदतीची मला गरज नाही. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच अशा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी पुन्हा केला.

चुकीच्या माणसांबरोबर आपणं गरज नसताना गेलो असे मला आता वाटते असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पश्चाताप व्यक्त केला. मला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा फडणवीस म्हणाले की भाजपचे सरकार सत्तेत येणार, तेव्हा ते कोणाबरोबर येणार, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन की इतर कोणाबरोबर हे आम्हाला माहित नसताना आम्ही काय कारणार, बहुमत नसताना भाजपचं सरकार कसे स्थापन करणार असा सवाल उद्धव ठाकरेंना भाजपला केला.

Visit : Policenama.com