अयोध्येत उद्धव ठाकरेंकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राम मंदिर निर्माणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणून 100 दिवस पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे अयोध्यात दर्शनासाठी गेले आहेत. यावेळी त्यांचा मुलगा आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

https://twitter.com/ShivSena/status/1236226744929202177

उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्या राम मंदिर माझ्यासाठी एक सौभाग्य आहे. मी अनेकदा अयोध्येला येईल. जागा मिळाल्यास अयोध्येत महाराष्ट्र भवन निर्माण केले जाईल. ते असे ही म्हणाले की आरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे जाऊ शकत नाही.

https://twitter.com/ShivSena/status/1236227860790042624

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पहिल्यांदा नोव्हेंबर 2018 मध्ये अयोध्येत आलो होतो आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री बनलो. आता तिसऱ्यांदा मी येथे येत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, ट्रस्टची निर्मिती झालेली आहे. बँकेत खाते देखील उघडण्यात आले आहे. मला आठवतंय की बाळासाहेब ठाकरेंच्यावेळी महाराष्ट्रातून विटा पाठवण्यात आल्या होत्या.

मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की महाराष्ट्रातून जे राम भक्त येतील त्यांच्यासाठी जमीन देण्यात यावी, आम्ही येथे महाराष्ट्र भवन बांधू. जेव्हा-जेव्हा येथे आलो आहे काही ना काहीतरी यश मिळवले आहे. मी पुन्हा येईन.