Uddhav Thackeray | “सगळे सोडून गेले की, हे फोटोग्राफी करायला मोकळे…”, भाजप आमदाराची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जून महिन्यात शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) झाली. यावेळी 40 आमदार आणि 12 खासदारांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली. शुक्रवारी शिवसेनेचा तेरावा खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी देखील शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधत टीका केली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी (MLA) गुवाहाटीला जाऊन बंड केले. त्यानंतर अनेक खासदार (MP) देखील त्यांच्यासोबत सामील झाले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्षावरच दावा केला. त्यातून वाद निवडणूक आयोगात (Election Commission) गेला आणि आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठविले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव आणि ढाल तलवार निवडणूक चिन्ह मिळाले. आता गजानन किर्तीकर यांनी देखील शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंना चिमटे काढून तोंडसूख घेत आहे. उद्धव ठाकरेंना सगळे सोडून गेले की, ते फोटोग्राफी करायला मोकळे, असे भाजपने म्हंटले आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

 

परंतु गजानन किर्तीकर शिंदे यांच्या गटात गेले असले, तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर (Amol Kirtikar)
मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. पिता पुत्रामध्ये मतभेद सुरु आहेत.
अमोल किर्तीकर यांनी वडिलांना समजाविण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
तसेच हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय असल्याचे अमोल किर्तीकर म्हणाले आहेत.

 

Web Title :- Uddhav Thackeray | bjp leader atul bhatkhalkar taunts shiv sena
uddhav thackeray after gajanan kirtikar join balasahebanchi shiv sena shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा