13 मुलं आणि 3 पुतणे, ‘घराणेशाही’ अधिक अन् ‘कॅबिनेट’ कमी दिसतयं ‘ठाकरे सरकार’चं मंत्रिमंडळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारमध्ये सध्या राजकीय घराण्यांना अच्छे दिन आहेत. कारण उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक अशा कुटुंबांचे वर्चस्व आहे ज्यांची राज्यात ताकद आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 43 मंत्री आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे या 43 पैकी 21 मंत्री असे आहेत जे कोणत्या तरी नेत्याचे मुलगा, मुलगी, पुतण्या अथवा जवळचे नातेवाईक आहेत. या कॅबिनेटवर एक नजर टाकली असता कॅबिनेटमध्ये 13 मुले आणि 3 पुतणे दिसून येतात, जे महाराष्ट्रातील राजकीय घराण्याशी संबंधीत आहेत.

CM सह 43 मंत्र्यांचा कोटा
सोमवारी महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शपथ ग्रहण केली. याप्रसंगी 26 कॅबिनट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यात मुख्यमंत्र्यांसह 43 मंत्री असू शकतात. 43 चा हा आकडा सोमवारी शपथग्रहण सोहळ्यानंतर पूर्ण झाला आहे. यापैकी 16 मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, मुख्यमंत्र्यांसह 15 मंत्री शिवसेनेचे, तर काँग्रेसच्या कोट्यातून 12 आमदार मंत्री झाले आहेत.

शिवसेनेतील घराणी
उद्धव ठाकरे :
जर सुरूवात शिवसेनेपासून केली तर सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत.

आदित्य ठाकरे : उद्धव ठाकरे यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेला मंत्री केले आहे.

शंभूराजे देसाई : शिवसेनेकडून मंत्री झालेले शंभूराजे देसाई महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत.

शंकरराव गडाख : उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते शंकरराव गडाख माजी काँग्रेस खासदार यशवंतरा गडाख यांचे पुत्र आहेत.

कांग्रेसमशील घराणी
अशोक चव्हाण : सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेणारे अशोक चव्हाण राज्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत, ते स्वत:सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते.

अमित देशमुख : लातूर शहरचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री अमित देशमुख माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत.

यशोमती ठाकुर : उद्धव सरकारमधील मंत्री यशोमती ठाकुर माची काँग्रेस आमदार दिवंगत भैयासाहेब ठाकुर यांच्या कन्या आहेत.

सुनील केदार : सोमवारी शपथ घेतलेले सुनील केदार हे माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे पुत्र आहेत.

वर्षा गायकवाड : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री वर्षा गायकवाड या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत.

विश्वजीत कदम : काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री झाले आहेत.

सतेज पाटील : ठाकरे सरकारमध्ये मंत्री झालेले सतेज पाटी हे बिहारचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते डि. वाय. पाटील यांचे पुत्र आहेत.

बाळासाहेब थोरात : मंत्री झालेले बाळासाहेब थोरात हे माजी काँग्रेस आमदार भाऊसाहेब थोरात यांचे पुत्र आहेत.

राष्ट्रवादीमधील घराणी
अजित पवार :
महाराष्ट्र सरकारमधील नंबर 2 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत.

धनंजय मुंडे : राष्ट्रवादीच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री झालेले धनंजय मुंडे हे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत.

राजेश टोपे : राज्य सरकारमध्ये मंत्री झालेले राजेश टोपे हे माजी खासदार दिवंगत अंकुश टोपे यांचे पुत्र आहेत.

बाळासाहेब पाटील : सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेणारे बाळासाहेब पाटील हे माजी काँग्रेस आमदार पांडूरंग पाटील यांचे पुत्र आहेत.

दिलीप वळसे पाटील : महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झालेले दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रेय पाटील हेसुद्धा आमदार होते.

आदिती तटकरे : मंत्री आदिती तटकरे या सुद्धा राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.

प्राजक्त तनपुरे : मंत्री प्राजक्त तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील यांचे पुतणे आहेत.

जयंत पाटील : उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री जयंत पाटील हे माजी काँग्रेस मंत्री स्वर्गीय राजाराम पाटील यांचे पुत्र आहेत.

राजेंद्र शिंगणे : महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झालेले राजेंद्र शिंगणे यांचे पिता भास्करराव शिंगणे हे आमदार होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/