शिवसेनेचं उद्या ‘फायनल’ ठरणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेला काही तास शिल्लक असले तरीही शिवसेना आणि भाजपमधील सत्तेची आणि चर्चेची कोंडी काही सुटताना दिसून येत नसून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

त्यानंतर आता भाजपने शिवसेनेला चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतर उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. या बैठकीत ते आमदारांशी चर्चा करणार असून त्यांचे मतदेखील जाणून घेणार आहे. त्यामुळे शिवसेना दबाव वाढवून सत्तेला वाटा वाढवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत जावे की नाही याविषयी आमदारांची मते जाणून घेतली जाणार आहेत. तसेच या बैठकीनंतर ते अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपबरोबर चर्चेला सुरुवात होणार
निकाल लागल्यानंतर शिवसेना सत्तेमध्ये अर्धा वाटा मिळावा यासाठी ठाम असून मागील 12 दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. अवकाळी पावसासंदर्भात त्यांनी बैठक बोलावली होती. यावेळी शिवसेनेचे 6 मंत्री या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चेची दारे उघडी झाली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे उद्या नक्की काय घडते हे पाहणे फार महत्वाचे आहे.

Visit : Policenama.com