‘हे दुर्दैवी’ ! फडणवीसांनी शपथविधीनंतर ‘ठाकरे सरकार’ वर सोडला टीकेचा पहिला ‘बाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात नवे सरकार स्थापन झाले, उद्धव ठाकरे राज्याने नवे मुख्यमंत्री झाला. माजी मुख्यमंत्र्यांना आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. काही वेळात कॅबिनेटची पहिली बैठक पार पडेल. सरकार कामाला लागले तसे आता विरोधी पक्ष असलेला भाजप सक्रिय झाला. मुख्यमंत्री झाल्या झाल्या आता विरोधकांचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पेलावे लागणार आहे. किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा आहेत मात्र विदर्भ, मराठवाड्याबद्दल चक्कार शब्द नाही अशी पहिली टीका नव्या सरकारवर झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष म्हणून नव्या पक्षाला घेरण्यास सुरुवात केली आहे. देवेंद फडणवीस यांनी ट्विट करत टीका केली. ते ट्विटमध्ये म्हणाले की महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!

आज किमान समान कार्यक्रमाची माहिती महाविकासआघाडीकडून देण्यात आली. त्यात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला संरक्षण,शेती या सर्व मुद्यावर आपण काम करणार असल्याचे स्पष्ट केले. परंतू यात विदर्भ, मराठवाड्याबद्दल चक्कार शब्द नाही अशी टीका तात्काळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

काही मिनिटांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता लगेचच नव्या सरकारवर निशाणा साधण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे.

Visit : Policenama.com