Uddhav Thackeray | सभागृहात केलेल्या ठसकेदार भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींनाही मारले ‘हे’ 3 टोमणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी केलेले आरोप त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या प्रत्युत्तराने अधिवेशन चांगलंच गाजलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सभागृहात ठसकेदार भाषण केलं. विरोधकांनी केलेल्या टीकेला, आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही (PM Narendra Modi) त्यांचं नाव न घेता त्यांना अनेक टोमणे लगावले.

 

बाबरी मशिदीच्या (Babri Masjid) वेळेस बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) ज्यांना वाचवलं ते तरी त्यांना काय उत्तर देणार आहेत ?, ज्यावेळेस त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं तेव्हा बाळासाहेब त्यांच्यासोबत राहिले. रावणाची तोंड उडवली पिक्चरमध्ये दिसतं नवीन तोंडं येत मात्र नंतर कळतं की त्याचा जीव बेंबीत आहे. तसेच काहींना केंद्रात सत्ता मिळाली मात्र त्यांना मुंबई पाहिजे असल्याचं असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

केंद्रीय यंत्रणा (Central System) इतक्या पोकळ झाल्या का ?, नवाब मलिक (Nawab Malik) मंत्री झाले, दाऊदची हस्तक सर्वत्र फिरताहेत हे आधी कसं दिसलं नाही. केंद्राच्या यंत्रणा फक्त टाळ्या वाजवा आणि दिवे लावा एवढंच करत आहेत ?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. ओबामांनी (Barack Obama) कधी ओसामा बीन लादेनच्या (Osama bin Laden) नावाने मत मागितलं नाही. ओबामांनी पर्वा न करता पाकिस्तानमध्ये (Pakistan) घुसून मारलं, याला म्हणतात हिंमत. तुम्हीही घुसून मारून दाखवा दाऊदला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासोबत तुम्ही होतात.
मात्र अफजल गुरूला (Afzal Guru) फाशी देऊ नये असं मुफ्ती यांचं म्हणणं आहे.
त्यासोबतच त्यांची मत कशी होतीत हे तुम्हालाही माहित होती मात्र तरीही तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप नेत्यांसह मोदींवरही निशाणा साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना फोटो मुदस्सर लांबीने हार घातल्याचा फोटो आहे.
अशाच प्रकारे माझे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत असल्याचंह म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.

 

Web Title :- Uddhav Thackeray | cm uddhav thackeray also taunted pm narendra modi without naming him

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा