Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी शिवसेना (Shivsena) भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. भाजपकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत टीकास्त्र डागलं. शिवसेना भवन फोडण्याच्या विधानाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी समाचार घेतला. आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लागता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला.

Uddhav Thackeray | cm uddhav thackeray criticize bjp

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास ((bdd chawls redevelopment)) प्रकल्पातील पुनर्वसन इमारतीचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरुवात माझ्या हस्ते होईल, असं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. कार्यक्रमाला येत असताना रस्त्यांच्या दोन्ही बाजूनं लोक होती म्हणून मी गाडीतून उतरुन चालत आलो. लोक फुलांची उधळण करीत होते, पण खरंतर या चाळीचे ऋण आमच्यावर आहेत. आता चाळीचं टॉवर करतोय, पण त्यांनी आपल्याला जे दिलं ते ऋण आपण फेडू शकत नाहीत. या चाळीच्या इतिहासाची मुळे खोलवर रुजलेली आहेत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असं टिळक म्हणाले, पण त्या स्वराज्यात हक्काचं घरं असायला हवं. तेच आम्ही करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपलं सरकार ट्रिपल सीट

यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली. सतेज पाटीलजी, डबल सीट म्हणाले. पण आपलं सरकार
ट्रिपल सीट (Our government triple seat) आहे. हे मुद्दामहून बोलतोय. कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डायलॉग आहे ना थप्पड से डर नही लगता… पण अशा थपडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचा समाचार घेतला.

हे देखील वाचा

Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe | लोकजनशक्ती पक्षातर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Maharashtra Police | राज्यातील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांचं ‘प्रमोशन’ लवकरच ! PI, उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या 5 ऑगस्टपर्यंत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Uddhav Thackeray | cm uddhav thackeray criticize bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update