CM Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रालय स्वत:कडे घ्यावे’; शिवसेना नेत्याची भूमिका

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) राजकीय कुजबुज होत असल्याची चर्चा आहे. भाजप (BJP) नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse- Patil) तत्परतेने कारवाई करत नाहीत अथवा भाजपविरोधात वळसे पाटील आक्रमक भूमिका घेत नाहीत. या कारणामुळे शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रवादीवर (NCP) नाराज असल्याची चर्चा राज्यात पसरली. दरम्यान यानंतर शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे (Aurangabad) माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठी भुमिका मांडली आहे. (CM Uddhav Thackeray)

 

”भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गृह खाते देखील स्वत:कडे घेऊन राज्याला योग्य दिशा द्यावी,” असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहखातं स्वत:कडे घ्यावं, अशी भूमिका उघडपणे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपद, गृहखातं स्वत:कडे ठेवलं होतं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी देखील गृहखातं (Maharashtra Home Department) स्वत:कडे घ्यावं,” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून आघाडी सरकारमधील नेते, मंत्र्यांवर केंद्रीय विविध संस्थानी कारवाईचा सपाटा लावला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपला जशासतसे उत्तर देण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
भाजपला जशासतसे उत्तर द्यावे अशी शिवसैनिकांची भावना आहे.
भाजप नेत्यांच्याविरोधात तसे पुरावे देखील देण्यात आले, मात्र राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते तत्परतेने कारवाई करत नसल्याची चर्चा शिवसेनेत आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | CM uddhav thackeray should take over the home ministry opinion of shiv sena leader chandrakant khaire

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा