Uddhav Thackeray | ‘मुंबई अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी पण…’; मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | गेली 17 वर्षे रखडलेल्या धारावीच्या विकासाबाबत (Dharavi Redevelopment Project) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) भाष्य केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. धारावी पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र केंद्र सरकारकडून (Central Government) जागा न मिळाल्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरे मिळावीत, यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. मुंबईचा विचार हा अनेकदा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून करण्यात आला. मुंबईचा (Mumbai) एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. आता त्या कष्टकऱ्यांना घरे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने विचार केला आहे, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितलं.

 

आपण असं मानतो की आजोबा नारळाचे झाड लावतात आणि त्याचे फळ नातवाला मिळते. पण आता नातवंडांच्या पण पुढे दिवस जात आहेत. फळे लागत आहेत पण मलई कोण खात आहे हा संशोधनाचा विषय असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

दरम्यान, सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय ? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत (300 Houses – For MLAs In Mumbai) घरे देणार आहोत, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | cm uddhav thackeray targets oppositions on dharavi Redevelopment Project zopadpatti punarvikas yojana maharashtra budget session

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा