उध्दव ठाकरेंनी आयोध्येला जाण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या बांधावर यावं : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या विश्वासाचा घात करणारे फसवे सरकार आहे. शेतकर्‍यांनी मागणी न करता शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री यांनी आयोध्येचा दौरा करण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या बांधावर येवुन शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात असा टोला राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महा आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंदापूर येथे लगावला.

हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तहसिल कार्यालय या ठिकाणी इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित महाआघाडी सरकार विरोधी धरणे आंदोलनात बोलत होते. कमाल व कीमान कार्यक्रमाच्या माध्यमातुन शेतकरी आपला केंद्रबींदु राहणार असुन शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासंदर्भात आज धरणे आंदोलन करत आहोत. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलण करून शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले. बंगला आणी गाड्यावरून महाआघाडीच्या मंत्र्यामध्ये भांडणे होणे ही या देशाच्या इतिहासातील पहिल्यांदा ही घटना महाआघाडी सरकारमध्ये घडली आहे.

राज्यातील विद्युत वितरण विभागाने चालु वर्षीचे लाइट बील अद्याप शेतकर्‍यांना दीले नाही. ऐन उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यानंतर लाइटबीले वाटून शेतकर्‍यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न विद्युत वितरणच्या माध्यमातुन असुन शेतकर्‍यांना शेतीची लाइट बीले न देता सर्व शेतकर्‍यांना सरसकट विजबील माफ व्हावे. दुध धंदा शेतकर्‍या पूरता नाही तर सर्वच स्तरातील लोक असल्याने दुधाला हमी भाव ४० रूपये द्यावा, कोरोना व्हायरसमुळे कुक्कुटपालन व्यवसाय कोलमडला. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असुन नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांचे पोल्टीचे पंचनामे व्हावेत.

हे आंदोलन राजकीय स्वार्थासाठी नाही तर तुमचा आमचा, गोरगरीब शेतकर्‍यांचा प्रपंच अडचणीत आल्याने हे आंदोलन करावे लागत आहे. अनैसर्गीक युती निसर्गाला खपत नाही त्यामुळे निसर्गाच्या विरोधातील सरकार लवकर कोसळेल.

विधानसभा निवडणूकीतील जनादेश डावलुन सत्तेत आलेलं सरकार हे संधीसाधु सरकार असुन जनतेची फसवणूक सुरू आहे. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू, सरसकट कर्जमाफी, अवकाळी ग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजाराची मदत, अशी आश्वासने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दीली होती. मुख्यमंत्र्यांना त्याचा विसर पडलेला आहे. दोन लाख रूपये कर्जमाफीची घोषणा करून शेतकर्‍यांची फसवणूक, तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, जलयुक्त शिवार योजनाना स्थगीती देवुन शेतकर्‍यांचे नुकसान या सरकारने केले असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाली असुन हिंगणगाव, सिल्लोड, नागपूर, सोलापूर, मुंबई,
कल्याण, पिंपरी अशा आनेक ठीकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असुन गुन्हेगारांना पोलीस यंत्रणेचा धाकच राहीला नाही. अशा घटनांना कायमस्वरूपी आळा बसावा यासाठी धरणे आंदोलन सुरू असुन या आंदोलनासाठी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर कृृषि उत्पन्न समीतीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, इंदापूर तालुका शिक्षन प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, बाजार समितीचे मा.सभापती मयुरसिंह पाटील, नासाहेब शेंडे, वसंतराव मोहळकर, पांडूरंग(तात्या) शिंदे, कृृृृष्णाजी यादव, विलासबापू वाघमोडे, रूतुजाताई पाटील, युवराज मस्के, आबा वीर, मंगेश पाटील, अतुल व्यवहारे, महेंद्र रेडके, शकिल सय्यद इत्यादी उपस्थित होते. सुत्रसंचलन कैलास कदम यांनी केले.