पवारांचं मन डांबरापेक्षाही काळं, त्यालाही लाज वाटेल : उद्धव ठाकरे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवारांना थोडं डांबर आणून देतो पण त्या डांबरालाही लाज वाटेल, कारण डांबरापेक्षा शरद पवारांचे मन काळ आहे, अशी जहरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर प्रचंड जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

राजीव गांधींच्या काळात शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा सांगितेल होते की एकवेळ मी भस्म लावेन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. मग भस्म जपून ठेवा निवडणूकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भस्म घेऊन हिमालयात जायचे आहे. जयंत पाटील बोलताना शिवसेनेने भाजपला मिठी का मारली. मग काय तुम्हाला मिठी मारायची होती. शरद पवारांनी काँग्रेसची युती तोडली तेव्हा म्हणाले की मी यापुढे काँग्रेसमध्ये जाणार नाही. एक वेळ तोंडाला काळ लावीन पण काँग्रेसमध्ये पुन्हा नाही जाणार. शरद पवार तुम्हाला थोड डांबर लावू का ? असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

नावापुढे राष्ट्रवादी लावून कोणी राष्ट्रवादी होत नाही. युती ही माझ्या महाऱाष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी केली. राज्यात आणि केंद्रात आपले सरकार येणारच, मतदानानंतर ताबडतोब दुष्काळावर काम करणार आहोत. मी खोट बोललो तर शिवसेनाप्रमुख कधीच माफ करणार नाहीत. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like