‘…तर इम्तियाज जलील यांचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठवाड्यानं औंरगजेबाला गाडलं, निजामाला गुडघे टेकायला लावलं. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही औरंग्या झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. औरंगाबादमधील मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी दांडी मारली होती. यावरून सामनाच्या संपादकीयमधून उद्धव ठाकरेंनी जलील यांचा समाचार घेतला आहे.

काय म्हटलंय सामनाच्या संपादकीयमध्ये ?

इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही औरंग्या झाल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मा स्मारकासमोर संभाजीनगरची जनताच तुम्हाला गुडघे टेकायला लावेल. आता शासनाने एक करावे, स्वातंत्र्य सेनानींचा हा असा अपमान करणाऱ्या खासदारास कोणत्याही शासकीय सोहळ्यास बोलावू नये. देवेंद्रजी काढा नवीन फतवा. महाराष्ट्रभूमीत अशा जलीलगिरीस थारा मिळता कामा नये.

– गेली 5 वर्ष मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या ध्वजारोह सोहळ्यास खास आमंत्रण असतानाही जलील येथे हजर रहात नाहीत हा प्रकार संतापजनक आहे.

– खासदार जलील यांनी सलग पाचव्यांदा या ध्वजारोहण सोहळ्यावर बहिष्कार टाकून स्वातंत्र्य सेनानींचा अपमान केला आहे. निजाम आणि त्याच्या जुलमी रझाकारी फौजांना सलाम केला आहे.

– जलील मागची साडेचार वर्षे आमदार होते. तेव्हाही त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम सोहळ्याकडे पाठ फिरवली व आता खासदार झाल्यावरही त्यांनी पुन्हा तेच शेण खाल्ले आहे.

– मराठावाडा आणि हैद्राबादेत निजामाची पिलावळ फूत्कार सोडत आहे. एमआयएम पक्षाचे पुढारी मियाँ ओवेसी हे उठसूठ संविधानावर हात ठेवून आम्ही कसे देशभक्त आहोत याचे खुलासे करत असतात. परंतु ट्रीपल तलाक समान नागरी कायदा, वंदे मारतम् म्हणण्यापासून मराठवाडा मुक्तीसंग्रामपर्यंत त्यांच्या भूमिका ते देशभक्त असल्याचे सिद्ध करत नाहीत.

-एमआयएमचा वंश हा निजामाचा असेल तर त्यांनी तसं स्पष्ट करावं. कारण त्यांचे बनावट देशभक्तीचे ढोंग सभाजीनगरात उघडे पडले आहे.

– संभाजीनगरातील मतदारांनी ही कोणती धोंडं बांधून घेतली आहेत? याचा पश्चाताप त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.

Visit – policenama.com 

You might also like