राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची अवलाद : उद्धव ठाकरे

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – शेतकऱ्यांबाबत मी जी भूमिका मांडली होती, ते भाजपाने ऐकलं मग युती का करू नको ? शरद पवारांना टीका करायला काय जात आहे ? मला सांगत आहेत की मी टीका केली. मी जे काही बोललो ते मला मान्य आहे. मला तुम्ही शिकवू नका, राष्ट्रवादीसारखी शेण खाणारी अवलाद आमची नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवरांवर निशाणा साधला.

परभणीमध्ये उद्धव ठाकरेंनी सभा घेतली त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या घणाघाती टीका केली. लाज वाटते का ? हा प्रश्न आम्हाला विचारत आहेत. हा प्रश्न कोण प्रश्न विचारतेय तर घोटाळेबाज आणि दरोडेखोर. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये दरोडेखोर आणि घोटाळेबाज आहेत. तेच आम्हाला विचारणार का लाज वाटते का ? हा प्रश्न विचारताना तुम्हाला लाज वाटते का ? असे म्हणत शरद पवार आणि राहुल गांधीवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर तिखट शब्दात निशाणा साधताना म्हणाले, सध्या राष्ट्रवादी काँग्रसला लाज वाटते का ? असा प्रश्न विचारत ट्विटरवर एक मोहीम सुरू केली आहे. हा प्रश्न अर्थातच विद्यमान सरकारला विचारला जातो आहे. याच घोषणेचा उद्धव ठाकरेंनी पुरेपूर समाचार यावेळी घेतला. शरद पवार मला माझ्याच वाक्यांची आठवण करून देत आहेत. मी ते बोललो नाही असे म्हटलेच नाही. मात्र ज्यांच्या पक्षात दरोडेखोर आहेत असे लोक मला जाब कसा काय विचारत आहेत ? राहुल गांधींच्या पक्षात घोटाळेबाज आहेत आणि राष्ट्रवादी पक्षात दरोडेखोर आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us