राणे म्हणजे युतीतील मिठाचा खडा, भाजपने सावध व्हावे : उद्धव ठाकरे

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – कणकवलीत विधानसभा मतदारसंघात युती तुटल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून सतीश सावंत यांना उमेदवारी दिली, त्यानंतर आज कणकवलीत प्रचारसभा घेत उद्धव ठाकरे यांनी विरोधात असलेल्या नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांच्यासह नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली.

यावेळी टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की राणेंच्या भाजप प्रवेशावर मी भाजपला शुभेच्छा देतो. राणे जेथे जातील तेथे पक्षाची वाट लावतील. परंतू मित्राच्या घरात चोर घुसत असेल तर गप्प कसं बसू. पाठीत वार करणारी औलाद नको म्हणून मी येथे भाजपला सावध करायला येथे आलोय, दादागिरी करण्याचा प्रकार कोणी केला तर आम्ही बघून घेऊ असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना कणकवलीत राणे पितापुत्रांवर तोफ डागली. ते म्हणाले की जो मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीत, तो मला काय सांगणार, युतीत राणे म्हणजे मीठाचा खडा आहे. इकडे वाकव मान तिकडे वाकव मान आणि पक्षाचे नाव स्वभिमान, असा स्वाभिमान काय कामाचा असा सवाल त्यांनी केला. नारायण राणेंना नेहमी सत्तेचा माज आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवत उद्धव ठाकरे म्हणाले की कोणाचे नुकसान करुन विकास होणार असेल तर आम्हाला तो विकास नको. उद्धव ठाकरेंच्या सभेत संदेश पारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपने हकालपट्टी केल्यानंतर संदेश पारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी