Uddhav Thackeray | ‘… तर 2024 ची निवडणूक शेवटची ठरु शकते’, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. आज जी परिस्थिती भाजपने शिवसेनवर (Shivsena) लादली आहे, तीच परिस्थिती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर त्याचा सामना केला नाही तर कदाचीत 2024 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election-2024) ही शेवटची निवडणूक ठरू शकते. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरु होऊ शकतो, असा घणाघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केला.

शिवधनुष्य जे रावणाला पेललं नाही ते…

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) याच्यावर निशाणा साधताना म्हणाले, काल ते म्हणाले की अमित शाह (Amit Shah) हे मला वडिलांसारखे आहेत, माझे तर वडील चोरलेच आहेत. आणखी किती जण ह्यांना वडिलांसारखे आहेत, कोण जाणे, असा टोला त्यांनी लगावला. शिवधनुष्य हे रावणाला पेलले नाही, या मिध्यांना काय पेलणार असे म्हणत शिवधनुष्य चिन्ह आणि शिवसेना पक्ष मिळवण्याची आपली लढाई सुरुच राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हा पूर्वनियोजित कट

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिंदे गटाने धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) आणि शिवसेना नाव
(Shiv Sena Party Name) चोरलं आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी
ते ठाकरे नाव चोरू शकत नाहीत. मी माँ आणि बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) पोटी जन्मला आलो,
हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाहीत,
असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

Web Title :- Uddhav Thackeray | current scenario in maharashtr is not stopped 2024 lok sabha elections may turn out to be last elections country says uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | संजय शिरसाट यांनी संजय राऊतांची तुलना केली पिसाळलेल्या कुत्र्याशी, म्हणाले- ‘इंजेक्शन द्यावं लागेल’

Pune Crime News | 24 वर्षाच्या तरुणीचा नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलीस आणि नागरिकांमुळे तरुणी बचावली