Uddhav Thackeray | काँग्रेस नेत्यानं मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिहीलं पत्र, म्हणाले – ‘मंत्रिमंडळातून या नेत्याला बरखास्त करा’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसमुस सुरूच असून पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (former mla ashish deshmukh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे मंत्री सुनील केदार (minister sunil kedar) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून सुनील केदारे हे २००२ मध्ये कार्यभार सांभाळत होते. त्यावेळी त्यांनी खाजगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये बँकेचे १५० कोटी रुपये गुंतवले आणि बँकेचं १५० कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप केदार यांच्यावर आहे. राज्याच्या सहकार खात्यानं या घोटाळ्याप्रकरणी केदार आणि इतर १० आरोपींविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. तब्ब्ल १९ वर्ष हा खटला असून सरकारी वकील म्हणून असिफ कुरेशी यांची नियुक्ती केली आहे.

असिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या खटल्यात कुरेशी योग्य बाजू मांडू शकणार आरोप करत त्यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी देशमुख यांनी केलीय. तसंच मंत्रिमंडळातून मंत्री सुनिल केदार यांनाही बरखास्त करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे देखील वाचा

Pune Mucormycosis | दिलासा ! पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत लक्षणीय घट; 2 महिन्यांत एकही मृत्यू नाही

Lic Jeevan Amar Policy | जर तुम्ही सुद्धा करत असाल स्मोकिंग, तर भरवा लागेल जास्त प्रीमियम; जाणून घ्या

Modi Government | मोदी सरकारकडे सरकारी संपत्ती विक्री करण्याची मोठी यादी तयार !

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Uddhav Thackeray | dismiss sunil kedar from cabinet ashish deshmukh wrote letter directly uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update